mamata banerjee
mamata banerjee e sakal
देश

''काँग्रेस अपयशी, ममता बॅनर्जी भाजपविरोधातील आघाडीचा चेहरा''

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांच्या युपीए आता उरलेली नाही (Mamata Banerjee's UPA Ramark) या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती. अनेक काँग्रेस (Congress) नेत्यांनी ममतांवर टीका केली होती. आता पुन्हा तृणमूल काँग्रेसचे (TMC) मुखपत्र 'जागो बांगला'मधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रसने स्वतःला शीतपेटीत बंद केल्याची टीका या मुखपत्राच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.

''सर्वात मोठा विरोधी पक्ष असूनही काँग्रेसने स्वतःला शीतपेटीमध्ये बंद केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चळवळीचे आयोजन करण्याऐवजी काँग्रेस नेत्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. काँग्रेसमधील ऊर्जा संपली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दलचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तरीही काँग्रेस निष्क्रीय झाली आहे'', असे टीएमसीने म्हटले आहे. गुलाम नबी आझाद यांनी येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्याच ट्विटचा संदर्भ देत तृणमूलने ''काँग्रेस अंतर्गत वादाने ग्रासलेली आहे,'' अशी टीकाही केली आहे. काँग्रेस नेत्यानेच पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल अशी आशा कमी आहे हे उघडपणे सांगितले आहे. हळूहळू पक्ष सत्तेपासून दूर जात आहे, असेही यामध्ये म्हटले आहे.

''ममता बॅनर्जी भाजपविरोधी आघाडीचा चेहरा'' -

''काँग्रेस अपयशी ठरली असून युपीए आता संपली आहे. सर्व विरोधकांनी एकजूट दाखवली पाहिजे. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे त्यांना आपल्याच पक्षातील लोकांना सांभाळणं कठीण झालं आहे. देशाला आज प्रबळ विरोधी शक्तीची गरज आहे. टीमएमच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांच्यावर विरोधी आघाडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कारण ममता बॅनर्जी सर्वात लोकप्रिय आणि सर्वांनी स्वीकारावा असा भाजपविरोधी आघाडीचा चेहरा आहे, असंही तृणमूलने म्हटले आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांसोबत चर्चा करताना त्यांनी ''युपीए कुठे आहे? आता युपीए नाही हे फक्त जाहीर करण्याचं बाकी आहे'' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपासून सर्वांनी ममतांवर टीका केली होती. काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी शक्यच नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT