sakal
देश

ममतांच्या भाच्याला पुन्हा ‘ईडी’चे समन्स

कोळसा गैरव्यवहारप्रकरणी चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील कोळसा गैरव्यवहाराशी संबंधित आर्थिक अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला आज समन्स बजावले असून त्यांची याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे.

अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बर या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. तृणमूल काँग्रेसचे ते राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत. सहा सप्टेंबर रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले असून त्यांच्या पत्नी रूजिरा यांना १ सप्टेंबर रोजी चौकशीला सामोरे जाण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित अन्य मंडळींना देखील चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून त्यांनाही वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत.

कोळसा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागील वर्षी अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. आता याच ‘एफआयआर’चा आधार घेत ‘ईडी’ने कारवाई करायला सुरूवात केली आहे. अनुप माझी उर्फ लाला हा या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जाते. या बेकायदा कोळसा व्यवहारातून मिळालेल्या मोठ्या निधीचे अभिषेक बॅनर्जी हे देखील लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

केंद्र सरकार आमच्याशी राजकीय आघाडीवर लढू शकत नाही त्यामुळेच तपास संस्थांचा वापर केला जात आहे. भाजप मंत्र्यांचे कोळसा माफियांशी लागेबांधे असून ही मंडळी निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्‍चिम बंगाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT