man allegedly dragged made to bark by wifes family at ghaziabad 
देश

...म्हणून जावयाच्या गळ्यात बांधला कुत्र्याचा पट्टा

वृत्तसंस्था

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): मुलगी आणि जावयाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला आणि कुत्र्यासारखे भुंकायला लावले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे तिचे कुटुंबिय चिडले होते. मुलगी आणि तिच्या नवऱयाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्यांना ओढले. शिवाय, कुत्र्यासारखे भुंकायला लावले. संबंधित व्हिडिओ मे 2019मध्ये शूट करण्यात आला होता. मात्र, सोशल मीडियावर तो आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

मारहाण करण्यात आलेल्या युवकाचे नाव इक्रामुद्दीन आहे. इक्रामुद्दीनने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही प्रेमविवाह केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबियांना आवडले नाही. त्यांनी आम्हाला उचलून आणले आणि वाईट वागणूक दिली. पत्नीचा भाऊ पोलिस असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.'

गाझियाबादच्या पोलिसांनी सांगितले की, 'आम्हाला नुकताच हा व्हिडिओ मिळाला असून, आम्ही चौकशी सुरू केली आहे. शिवाय, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.' दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: गुजरात टायटन्सचे सलामीवीर अपयशी, वैभव सूर्यवंशीला लागली लॉटरी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT