man cuts off wifes tongue after kiss at Ahmedabad. (Image Source: dailystar.co.uk) 
देश

प्रेमाने जवळ घेत किस घेतला अन् कापली जीभ...

वृत्तसंस्था

अहमदाबाद: दोघांच्या भांडणानंतर त्याने प्रेमाने जवळ घेतले आणि किस घेतला. पण काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने जीभ कापल्याची घटना शहरातील जुहापुरा भागामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वेजालपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारीकेचे काम करत आहे. 2004 मध्ये तिचा विवाह झाला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी घटस्फोट घतेला.  24 मार्च 2018 रोजी तिने जुहापूरा येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसरा विवाह केला. त्या माणसाची आधीच दोन विवाह झाले होते. विवाहानंतर नवरा अजूनही दुसरी पत्नी आणि तिच्या मुलाबरोबर राहत असल्याचे तिला समजले, यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. शिवाय, नवरा काहीच काम करत नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची किंवा व्यवसाय सुरु करण्याची तिने विनंती केली. नोकरीचा तगादा मागे लागवल्यामुळे तो मारहाण करत असे. गेल्या आठवडयात त्याला पैसे न दिल्यामुळे त्याने मारहाण केली. बुधवारी (ता. 9) रात्री अकराच्या सुमारास नवरा प्रेमाने माझ्याजवळ आला. प्रथम त्याने चुंबन घेतले आणि काही कळायच्या आत त्याने धारदार शस्त्राने जीभ कापली, असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, नवऱ्याने जीभ कापल्यानंतर बाहेरुन दरवाजा बंद करून पळून गेला. महिलेने तिच्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन स्वत:ची परिस्थिती दाखवली. महिलेची बहिण तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला व महिलेला सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल केले. महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT