man cutting a palm tree while sitting on it video viral 
देश

Video: लाकूडतोड्याने कापला शेंडा; पुढे काय झाले पाहा...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः लाकूडतोड्याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अशाच एका लाकूडतोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

लाकूडतोड्या लाकूड तोडण्यासाठी निघाला. तो झाडावर बसला आणि फांदी कापू लागला. गावातील एकाने ते बघितले आणि त्याला सांगितले की ज्या फांदीवर तो बसला आहे ती कापली पडून मरशील. पण, लाकूडतोड्या न ऐकता फांदी तोडतो आणि फांदीसह खाली पडतो. ही गोष्ट अनेकांनी ऐकली असेल. या गोष्टीशी साधर्म्य असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती झाडावर बसून झाडाचा शेंडा कापत आहे. पण हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. कारण, हे झाड साधेसुधे नाही तर पाम ट्री आहे. किनारपट्टीला सर्रास दिसणाऱ्या नारळ-सुपारींच्या झाडांपेक्षाही पाम ट्री जास्त उंच असते. त्यामुळे त्याचा शेंडा कापणे अधिक अवघड असते. एक व्यक्ती पाम ट्रीवर बसून त्याचा शेंडा कापत आहे. आणि शेंडा तुटून खाली पडतो. यानंतर झाडावर ती व्यक्ती अडकून राहताना दिसते. झाड हेलकावे खाताना दिसत असून, ती व्यक्ती पकडून बसलेली पाहायला मिळते.

दरम्यान, व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, 6 मिलियनपेक्षाही अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. झाड असे कापले जात नसल्याचे अनेकांनी प्रतिक्रियांमधून म्हटले आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT