man eat full plate gulabjamun video viral 
देश

Video: गुलाबजाम किती खाल्ले मोजा बरं...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: एका पंक्तीमध्ये बसलेली व्यक्ती गुलाबजाम खात असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ताटभर घेतलेले गुलाबजाम एकामागोमाग एक खाल्यामुळे किती गुलाबजाम खाल्ले असावेत, असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.

विवाह सोहळ्यादरम्यान अनेकदा गुलाबजाम हा गोड पदार्थ केला जातो. पण, एखादी व्यक्ती किती गुलाबजाम खाऊ शकते? दोन, चार, सहा. पण, एका व्यक्तीने ताटात अनेक गुलाबजाम घेतले असून, ते फस्त करताना दिसत आहेत. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात लग्नसोहळ्यातलं जेवण खायला न मिळाल्याची कसर ही व्यक्ती एकाच दिवशी भरून काढते आहे. लग्नसोहळ्यातील इतर व्यक्तींची कसर ही व्यक्ती भरून काढते की काय? गुलाबजाम किती खाल्ले मोजा बरं? अरे बाबा! बस कर आता किती खाशील, अशा प्रतिक्रिया व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स नोंदवत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'एका व्यक्तीच्या ताटातील निम्म्याहून अधिक भाग गुलाबजामनेच भरला आहे. ताटाच्या अगदी कोपऱ्यात थोडासा भात आणि आमटी आहे. तोंडात टाकलेला एक गुलाबजाम संपत नाही तोपर्यंत दुसरा गुलाबजाम खाते. काही मिनिटातच अनेक गुलाबजाम खाल्ले आहेत. पण, संबंधित व्हिडिओ कुठला आहे, कधीचा आहे याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT