Delhi 
देश

'ये लो आझादी' म्हणत जामियाबाहेर त्याने केला गोळीबार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीतील जामिया विद्यापीठाबाहेर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये घुसून एका बंदुकधारी युवकाने गोळीबार केल्याने एक जण जखमी झाला आहे. पोलिसांसमोर तो बंदुकधारी व्यक्ती घोषणा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या कृतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएएविरोधात जामिया विद्यापीठात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील शाहीन बागप्रमाणे येथेही या कायद्याला विरोध करण्यात येत आहे. आज या आंदोलनात थेट बंदुकधारी व्यक्तीने प्रवेश केला. गोपाळ असे या बंदुकधारी व्यक्तीचे नाव असून, त्याने पोलिसांसमोरच घोषणाबाजी करत गोळीबार केला. या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हटलेच पाहिजे, तुम्हाला आझादी देण्यासाठी मी आलो आहे, असे तो बोलत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये गोपाळ हा रस्त्यावरून बंदूक दाखवत ये लो आझादी असे म्हणत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याने केलेल्या गोळीबारात शादाब हा युवक जखमी झाला असून, त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. हा युवक रस्त्यावरून बंदूक घेऊन चालत असताना पोलिस त्याच्याकडे केवळ बघ्याच्या भूमिकेत पाहत होते. अखेर त्याला अटक करण्यात आली असून, पोलिस चौकशी करत आहेत. 

देश के गद्दारोंको गोली मारो, असे वक्तव्य नुकतेच भाजप नेत्यांनी केले होते. यावरून आता विरोधी पक्षांकडून सरकारला घेरले जात आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की अनुराग ठाकूर आणि 9 वाजता टिव्हिवर हजेरी लावणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांचे आभार. कारण, एक दहशतवादी विद्यार्थ्यांमध्ये घुसून पोलिसांसमोर गोळीबार करण्याचे धाडस करत आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT