man goes to buy subji in market and get married with girlfriend at uttar pradesh 
देश

आई म्हणाली; भाजीपाला आणं तो सून घेऊन आला अन्...

वृत्तसंस्था

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान आईने मुलाला भाजी आणण्यासाठी बाजारात पाठवले पण येताना तो सून घेऊन घरी आला. यानंतर आईने थेट पोलिसचौकीच गाठली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनदरम्यानही अनेकठिकाणी विवाह होताना दिसतात. विवाहाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा साहिबाबाद येथे घडला आहे. आईने भाजीपाला आणण्यासाठी मुलाला बाजारात पाठवले होते. पण, घरी येताना तो सुन घेऊन आला. मुलासोबत सून आल्याचे पाहून आईने दोघांना घरात घेण्यास नकार दिला. काही वेळातच आईने पोलिस चौकी गाठली.

पोलिस चौकीत जाऊन आईने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मुलाला आणि सुनेला बोलावून घेतले. यावेळी मुलाने सांगितले की, आमचा विवाह एक महिन्यांपूर्वीच हरिद्वारमध्ये झाला आहे. पण, याबाबत आम्ही कोणाला सांगितले नव्हते. पण, आई आम्हाला घरात घेत नाही. यानंतर पोलिसांनी यावर मार्ग काढत दोघांना भाड्याने घर घेऊन राहण्याचा सल्ला दिला. दोघांच्या विवाहाची चर्चा परिसरात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT