Karnataka Crime News esakal
देश

Karnataka Crime: धक्कादायक! आधी डोकं दगडानं ठेचलं अन् नंतर 85 वर्षाच्या वृद्ध महिलेवर केला बलात्कार; आरोपीला अटक

32 वर्षीय मिथुन कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

आरोपीनं तिला लिफ्ट देऊ असं आश्वासन देऊन महिलेला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर त्यानं तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) हसन जिल्ह्यातील (Hassan District) 85 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा छडा लावलाय. पोलिसांनी दोषीला देखील अटक केलीये.

32 वर्षीय मिथुन कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यातील यारेहल्ली गावात 2 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. एका वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह शेतात सापडला, तिचं डोकं ठेचण्यात आलं होतं.

पोलिसांनी तपास केल्यानंतर, पाच वर्षांपूर्वी वृद्ध महिलेवर बलात्काराच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या आरोपींच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितलं की, पीडित वृद्ध महिला तिच्या शेतात जाऊ शकत नव्हती, त्यामुळं तिनं एका दुचाकीस्वाराकडं लिफ्ट मागितली.

आरोपीनं तिला लिफ्ट देऊ असं आश्वासन देऊन महिलेला दुचाकीवर बसवलं. त्यानंतर त्यानं तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. जेव्हा वृद्ध महिलेनं विरोध केला, तेव्हा आरोपीनं तिचं डोकं मोठ्या दगडानं ठेचलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.

वृद्ध महिला घरी न परतल्यानं चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी तिचा शोध सुरू केला असता, तिचा मृतदेह शेतात सापडला आणि हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT