man shot friend when he was coughing while playing ludo at uttar pradesh 
देश

खोकल्यावर मित्र म्हणाला तूला कोरोना झाला का अन्...

वृत्तसंस्था

नोएडा: कोरोना व्हायरसने जगाला वेढा घातल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण घरामध्ये बसले असून, वेळ घालवताना दिसतात. एका मंदिरात खेळत असताना मित्र खोकला म्हणून त्याच्यावर दुसऱया मित्राने गोळी झाडल्याची घटना येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जारचामधील सैंथली मंदिर परिसरात चार मित्र (जय, वीर उर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत) लुडो खेळत होते. यावेळी प्रशांतला खोकला आला. त्यावेळी गुल्लू आणि इतर मित्रांचा प्रशांतसोबत वाद झाला. प्रशांत खोकून कोरोना पसरवत असल्याचे इतरजण म्हटले. यानंतर संतापलेल्या गुल्लूने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून प्रशांतवर गोळी झाडली. प्रशांतच्या मांडीला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा केली. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे अकरा हजारांपेक्षा जास्त असून, ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates : पुण्यात पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम आणि ड्रोन शोचे आयोजन

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

Electric Bike: बंगळूर महामार्गावर ई-बाइकला आग; दुचाकीस्वार महिला बचावली, वाहनांच्या तीन किलोमीटर रांगा

SCROLL FOR NEXT