Madhya Pradesh Crime Sakal
देश

धुळवडीला नाचताना स्वतःवरच चाकूनं वार, तरुणाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

धुळवडीला मित्रांसोबत नाचत असताना तरुणाने अचानक स्वतःवर चाकून वार केले. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील इंदूरमधील (Indore Madhya Pradesh) बाणगंगा परिसरात उत्सवादरम्यान ही घटना घडली असून परिसरात खळबळ माजली आहे.

गोपाळ, असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बाणगंगा येथे धुमधडाक्यात धुळवड साजरी केली जात होती. यावेळी तरुण डिजे लावून नाचत होते. सर्वजण उत्सवाचा आनंद घेत असताना एक तरुण हातात चाकू घेऊन नाचत होता. त्याने अचानक स्वतःवरच चाकूचे वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, उत्सवादरम्यान नाचतानाचे क्षण काहींनी मोबाईलमध्ये कैद केले. त्यामध्येच हा तरुण स्वतःवर चाकूने वार करत असल्याचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SAIMS) येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असं बाणगंगा पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी योगेश सिंग यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT