Election voting SAKAL
देश

Manipur Election 2022: बदलल्या मतदानाच्या तारखा; वाचा नव्या तारखा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु मणिपूरच्या निवडणूका आयोगासाठी आणि पोलिस प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. मणिपूरची भौगोलिक स्थितीबरोबरच सक्रिय बंडखोर संघटना डोकेदुखी आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या तारखांमध्ये फेरबदल केला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी २७ फेब्रुवारीऐवजी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चऐवजी ५ मार्चला होणार आहे. (Manipur Assembly Election 2022)

विधानसभा निवडणुकीत ‘अफ्स्पा’ मुद्दा कळीचा; सुव्यवस्थेचेही आव्हान
मणिपूरमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणूका घेण्याचा आयोगाकडून दावा केला जात असून दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. राज्यातील परवानाधारक पिस्तूल आणि बंदुका जमा करणे हे देखील प्रशासनासाठी कष्टाचे काम ठरत आहे.

मणिपूरमध्ये एकूण ६० जागा असून पहिल्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारी रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चला होणर आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल यांच्या मते, ८ जानेवारी रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर राज्यात आतापर्यंत १५२४० शस्त्र परवाने जमा करण्यात आले आहेत. हे प्रमाण एकूण परवान्याच्या ५८ टक्केच आहे. परंतु हा आकडा ६० टकक्यापेक्षा अधिक होईल, असा दावा त्यांनी केला आहे. पोलिस प्रशासनाकडून शस्त्र परवाने गोळा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २५,२९९ परवानाधारक शस्त्रधारी असून सर्वांना प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हत्तींच्या कळपाला राजधानी एक्सप्रेसची भीषण धडक, ५ डबे रुळावरून घसरले; ८ हत्तींचा मृत्यू

India T20 World Cup Announcement: शुभमन गिलच्या स्थानाला 'या' खेळाडूकडून धोका; SMAT मध्ये १० सामन्यांत चोपल्यात ५१७ धावा, ५१ चौकार अन् ३३ षटकारांचा पाऊस

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

Nashik : भावाच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न, बनावट आधार कार्डमुळे उघड; एकाला घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT