Manipur Assembly Election esakal
देश

मतदानादरम्यान पोलिसांकडून गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मणिपूर निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय.

मणिपूर निवडणुकीच्या (Manipur Assembly Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. 22 जागांवर आज 92 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर, एकूण 1247 मतदान केंद्रं उभारण्यात आली असून निवडणूक आयोगाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

आज मणिपूरचे (Manipur Assembly Constituency) तीन वेळा मुख्यमंत्री ओ इबोबी सिंग (O Ibobi Singh) आणि माजी उपमुख्यमंत्री गायखंगम गंगमेई (Gaikhangam Gangmei) यांचं भवितव्यही जनता ठरवणार आहे. दोन्ही नेते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या टप्प्यात Thoubal, Chandel, Ukhrul, Senapati, Tamenglong आणि Jiribam जिल्ह्यात मतदान होत असून एकूण 8.38 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

या निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. करोंग (Karong) मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळाबार केल्यामुळं त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करोंग येथील भाजप (BJP) उमेदवारानं केलाय. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत असून या घटनेनंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. या निवडणुकीत भाजप 22, काँग्रेस 18, एनपीपी 11, नागा पीपल फ्रंटचे 10 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकाकडून विजयाचे मोठ-मोठे दावे केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT