Manipur burning  
देश

मणिपूर पुन्हा पेटलं! चार जणांचा मृत्यू, पाच जिल्ह्यात कर्फ्यु, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manipur burning नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर पुन्हा पेटलं आहे. मणिपूरच्या लेंगोल पहाडी भागात गोळ्या घालून चौघांची हत्या करण्यात आली आहे, ११ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूर पुन्हा पेटलं आहे. मणिपूरच्या लेंगोल पहाडी भागात गोळ्या घालून चौघांची हत्या करण्यात आली आहे, ११ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जबरदस्तीने वसुली करण्यासाठी हल्लेखोर लिलोंग चिंगजाओ भागात आले होते पण तेंव्हा स्थानिकांनी त्यांना तिथून हाकलून बाहेर काढलं. त्यावेळी तिथून जाताना हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यात चौघांचा मृत्यू झालाय.

स्थानिक नागरिकांनी काही गाड्यांना आग लागल्यामुळे वातावरण तापलं होतं. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपुर जिल्ह्यात सरकारने कर्फ्यु लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. (Manipur burning Four people died curfew in five districts emergency meeting called by Chief Minister )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता,तर अकरा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. त्यांनी काही वाहनांना आग लावून टाकली.

कर्फ्यु

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ताज्या हिंसेमुळे थौबल, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि बिष्णूपूर जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. एका व्हिडिओ संदेशात मुख्यमंत्री बीरेन सिंह म्हणालेत की, मी या हिंसेचा निषेध करतो. लिलोंगच्या लोकांनी शांतता ठेवावी असं मी आवाहन करतो. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस काम करत आहेत. आरोपींना कायद्यानुसार शिक्षा देण्यात येईल.

आतापर्यंत १८० जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये हिंसा थांबण्याचं नाव घेत नाही. या हिंसेमध्ये आतापर्यंत १८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मैतेई आणि कुकी समाजात हा संघर्ष सुरु आहे. मैतेई समूदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आला आहे. राज्यात ५३ टक्के मैतेई लोक राहतात, तर आदिवासी-नागा आणि कुकी समाज ४० टक्क्यांच्या जवळ आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

'हम आपके हैं कौन' साठी कुणाला किती मिळालेलं मानधन? माधुरीला सगळ्यात जास्त तर रीमा लागूंना मिळालेले फक्त...

SCROLL FOR NEXT