Manipur Violence esakal
देश

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराला हायकोर्ट जबाबदार; अमित शाहंचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून शांत असणारे मणिपूर धगधगते आहे.

धनश्री ओतारी

गेल्या काही दिवसांपासून शांत असणारे मणिपूर धगधगते आहे. काही आंदोलकांनी बुधवारी बिष्णुपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री कोन्थौजम गोविंद दास यांच्या घराची तोडफोड केली. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मणिपूर हिंसाचाराला हायकोर्ट जबाबदार असल्याचे म्हटले आहे. (Manipur clashes due to HC order all will get justice: Amit Shah in Assam )

अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचाराला हायकोर्टाचा आदेश जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही मणिपूर उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेईतेई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्यासाठी शिफारस दाखल करण्यास सांगितले होते.

गुवाहाटी दौऱ्यावर असताना अमित शाह बोलत होते. "न्यायालयाच्या निकालामुळे मणिपूरमध्ये काही चकमकी झाल्या आहेत." 'मी मणिपूरमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना आवाहन करतो की, 6 वर्षांपासून आम्ही पुढे जात आहोत. एकदाही ते थांबले नाही, अवरोध नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेले मतभेद आम्ही संवाद आणि शांततेने सोडवू. कोणावरही अन्याय होणार नाही, हे नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे.

तसेच अमित शाह मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. मी लवकरच मणिपूरला जाईन आणि तेथे तीन दिवस राहीन, परंतु त्याआधी दोन्ही गटांनी अविश्वास आणि संशय टाळावा. राज्यात शांतता प्रस्थापित होईल, याची खबरदारी घ्यावी. राज्यातील संघर्षातील सर्व पीडितांना न्याय मिळेल. परंतु राज्यात शांतता सुनिश्चित करण्यासाठी लोकांनी चर्चा केली पाहिजे, असे शहा म्हणाले.

मेईतेई समुदायाच्या एसटी मागणीच्या विरोधात ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने काढलेल्या एकता मोर्चानंतर 3 मे रोजी हिंसाचार उसळला होता. विशेष म्हणजे त्या काळात राज्यातील कुकीबहुल भागातही मणिपूर सरकारविरोधातील तणाव वाढत होता. या हिंसाचारात किमान 75 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गुरुवारी गृहमंत्री नित्यानंद राय आणि भारतीय जनता पक्षाचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा इम्फाळला पोहोचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT