Manipur Violence esakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

सकाळ डिजिटल टीम

Manipur Violence : धुमसणारं मणिपूर शांत व्हायचं नाव घेत नाहीये. दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हीडिओने देश हादरुन गेला होता. आता पुन्हा एक घटना समोर येत आहे. या घटनेत दोन तरुणींवर अत्याचार करुन जमावाने त्यांचा खून केल्याचं पुढे येतय.

ही घटना इम्फाळामधील कोनुं मामांग येथे घडली असून जिथे महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती तिथून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी कुकी समाजाच्या होत्या. या प्रकरणातही पोलिसांनी गांभीर्य बाळगलं नसल्याचा आरोप होत आहे.

नव्याने पुढे आलेल्या या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, काही महिलांनीच पीडित दोन तरुणींना एका खोलीत नेले आणि पुरुषांना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. तब्बल दीड तास पीडित तरुणींवर अत्याचार सुरु होते. त्यानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले आणि फेकून दिले.

१०० ते २०० जणांच्या घोळक्याने हे संताप आणणारे कृत्य केले आहे. लैंगिक अत्याचाराचा कलंक बसू नये म्हणून सुरुवातीला पीडितांची ओळख उघड करण्यात आलेली नव्हती. मात्र एका मुलीच्या आईने १६ मे रोजी सायकूल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

त्या एफआयआरमध्ये तकारदार महिलेच्या मुलीवर आणि अन्य एका मुलीवर अत्याचार करण्यात आले असून त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं होतं. नंतर हे प्रकरण इम्फाळ जिल्ह्यातील पोरोम्पत पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आलं. अजूनही या तरुणींचे मृतदेह सापडलेले नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला ताब्यात घेतलेले नाही. 'झी न्यूज हिंदी' ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT