Manipur Legislative Assembly election 2022 Trinamool MLA joins BJP sakal
देश

Manipur Assembly Election 2022 | तृणमूलच्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज तृणमूल कॉंग्रेसला धक्का बसला. राज्यातील तृणमूल काँग्रेसचे एकमेव आमदार तोंगब्रम रोबिंद्रो आणि काँग्रेसचे माजी आमदार वाय सुरचंद्र यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. आमदार तोंगब्रम रोबिंद्रो हे विष्णूपूरच्या थंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर वाई सूरचंद्र काकिंग जिल्ह्यातील काकचिंग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.(Manipur Legislative Assembly election 2022 Trinamool MLA joins BJP)

भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजप मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष ए.शारदा देवी, भाजपचे सहप्रभारी अशोक सिंघल, माजी खासदार भाभानंद यांनी तोंगब्रम आणि वाई सूरचंद्र यांचे स्वागत गेले. यावेळी अशोक सिंघल म्हणाले, की आगामी निवडणुकीत भाजप किमान ४० जागा जिंकून मणिपूरमध्ये सरकार स्थापन करेल. मणिपूरच्या ६० जागांसाठी २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यांत ३८ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यांत २२ जागांवर मतदान होईल. भाजपमध्ये सामील झालेले सुरचंद्र म्हणाले, की शारिरीक रुपाने आपण काँग्रेससमवेत असलो तरी माझे हृदय भाजपसमवेत होते. परंतु आज पूर्णपणे भाजपचा झालो आहे. काकिंग जिल्ह्यात पक्षाला अधिकाधिक मत देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT