Manipur Violence esakal
देश

मणिपुरात पुन्हा भडका! आक्रमक जमावानं पोलिस ठाण्यावर हल्ला करत लुटला 235 रायफल, 21 पिस्तूल, 9 हजार गोळ्यांसह शस्त्रसाठा

मणिपुरात मेईतेई-कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू, एक हजाराहून अधिक जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manipur Violence : मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.

बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी (4 ऑगस्ट) रात्री मेईतेई समुदायाच्या (Meitei community) तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा (Manipur Rifles) एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला.

जमावानं 235 असॉल्ट रायफल, 21 सब-मशीन गन, 16 पिस्तूल, 9,000 गोळ्या आणि 124 हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट (Kuki community), इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने हिंसाचारात बळी पडलेल्या 35 जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.

3 ऑगस्ट रोजी दुसर्‍या घटनेत बिष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुगकचाओ युनिटमध्ये शेकडो लोक जमले होते. यानंतर हल्लेखोरांना हाताळण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये 347 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मणिपूरमधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, 50 हजारांहून अधिक लोकांना छावणीत राहण्यास आणि राज्य सोडण्यास भाग पाडलं जात आहे. अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT