Manipur Fire
Manipur Fire 
देश

Manipur Violence: मणिपूरमध्ये 400 जणांनी पेटवलं पोलीस अधीक्षकांचं कार्यालय; हल्लेखोरांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश

Amit Ujagare (अमित उजागरे)

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुमारे वर्षभरापासून सुरु असलेला हिंसाचार अद्यापही थांबवण्याच नाव घेत नाहीए. अधुमधून पुन्हा जमावाकडून हिंसाचाराच्या घटना इथं घडत आहेत. त्यामुळं इथली कायदा सुव्यवस्था पार देशोधडीला लागलीए.

याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे ते म्हणजे ४०० जणांच्या जमावानं चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयचं पेटवून दिलं आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत जाळपोळ करतान एक पोलीस कॉन्स्टेबल दिसून आला आहे. (Manipur Violence 400 people set fire to SP office one police constable was also included among attackers)

मणिपूरमधील परिस्थिती आता स्थानिक पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे. कायदा अन् सुव्यवस्था इथं पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यातच एक कुकी पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा पोलीस आधीक्षकांचं कार्यालय जाळण्यात त्याचाही सहभाग असल्याचं दिसून आलं आहे. हा व्हिडिओ समोर येताच या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, चिंतेची बाब ही आहे की ज्या ठिकाणी आज हिंसाचार झाला आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी अर्थात दुरचांदपूर इथं मोठा हिंसाचार झाला होता. त्यामुळं हा भाग सध्या खूपच संवेदनशील बनला आहे. यापूर्वी देखील इथं हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी परिस्थिती अधिक चिघळली आहे कारण हिंसाचार करणाऱ्यांनी दगडफेकही केली आहे. त्यामुळं पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. (Latest Marathi News)

मणिपूर का जळतंय?

मणिपूरमध्ये तीन महत्वाचे समुदाय वास्तव्य करतात. यामध्ये दोन समुदाय हे पर्वतीय भागात राहतात तर एक समाज पठारी भागात राहतो. जो भाग पठारी भागात राहतो मैतेई हा समुदाय असून तो एकत्रितरित्या राहतो आहे. या समुदायाची राज्याच्या लोकसंख्येत ५३ टक्के इतकी लोकसंख्या आहे. तर नागा आणि कुकी हे दोन आदिवासी समुदाय पर्वतीय भागात विखुरलेल्या स्थितीत राहतो आहे.

मणिपूरच्या कायद्यानुसार, मैतेई समाज जो पठारी भागात राहतो त्यांना पर्वतीय भागात जमिनी विकत घेता येणार नाहीत. त्याचबरोबर मैतेई समाजाची ही प्रमुख मागणी आहे की त्यांना अनुसुचित जातीचा दर्जा दिला जावा, पण अद्याप त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळं मैतेई आणि कुकी या समाजांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT