Manipur Violence Esakal
देश

Manipur Violence: सुट्टीवर घरी आलेल्या कमांडोची गोळ्या घालून हत्या! CRPFनं दिले महत्वाचे आदेश

एटीएसयूएम आयोजित केलेल्या 'आदिवासी एकता मार्च' नंतर चुराचंदपूर जिल्ह्यातील टोरबुंग भागात हिंसाचार उफाळला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या हिंसाचारात सुट्टीवर घरी आलेल्या एका सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सीआरपीएफकडून आपल्या जवानांसाठी विशेष आदेश जाहीर करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या सर्व जवानांनी आपल्या कुटुंबियांसह तातडीनं सीआरपीएफच्या किंवा बीएसफच्या बेस कँपमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. (Manipur Violence Commando who came home on vacation shot dead)

सीआरपीएफच्या अंतर्गत माहितीनुसार, सीआरपीएफनं आपल्या सर्व युनिट्स, विंग्ज आणि सेक्टर्सना आपल्या जवानांशी संपर्क करण्याच्या सूचना केल्या आहेत. आपले जवान सुरक्षित आहेत ना? याची खातरजमा करण्याची तसेच त्यांना कुटुंबियांसह जवळच्या फोर्स स्टेशनमध्ये न्यावे असे आदेश दिले आहेत.

सीआरपीएफच्या माहितीनुसार, सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो असलेल्या २७ वर्षीय कॉन्स्टेबल चोंगहोलेन याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा कमांडो सुट्टीवर आपल्या मणिपूर इथल्या घरी आला होता. ७ मे रोजी तो पुन्हा ड्युटीवर जॉईन होणार होता. बिशनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत या जवानाचं घर असून याच भागात सध्या जातीय दंगल भडकली आहे.

ऑल आदिवासी विद्यार्थी संघ मणिपूरने (एटीएसयूएम) बुधवारी आयोजित केलेल्या 'आदिवासी एकता मार्च' दरम्यान चुराचंदपूर जिल्ह्यातील टोरबुंग भागात या प्रदेशात प्रथम हिंसाचाराचा भडका उडाला होता. मेटेई समुदायाच्या एसटी दर्जाच्या मागणीवर मणिपूर हायकोर्टानं गेल्या महिन्यात राज्य सरकारला चार आठवड्यांच्या आत केंद्राकडं शिफारस पाठवण्यास सांगितल्यानंतर नागा आणि कुकींसह आदिवासींनी मोर्चाचे आयोजन केले होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT