Manipur Violence continues Ambulance set on fire three killed crime  sakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराची धग कायम; रुग्णवाहिका पेटवली, तीन जणांचा मृत्यू

समाजकंटकांनी रुग्णवाहिका पेटवून दिल्याने तीन जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

इम्फाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराने रौद्र रुप धारण केले असून धक्कादायक घटना समोर येत आहेत. शेकडो समाजकंटकांनी जखमी मुलाला दवाखान्यात घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका पेटवून दिल्याने तिघांचा होरपळून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना पश्‍चिम इम्फाळच्या इसोइसेम्बा येथे रविवारी घडली.

चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. मृतांत ८ वर्षाच्या जखमी मुलाचा समावेश होता. त्यांचे मृतदेह अद्याप सापडले नसल्याचे सूत्राने सांगितले. तोंसिंग हैंगिंग (वय ८), मीना हैंगिंग (वय ४५) आणि लिडिया लोरेम्बम (वय ३७) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात एका लहान मुलाच्या डोक्याला गोळी लागली होती. त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून इम्फाळला नेण्यात येत होते. यावेळी त्याच्यासमवेत त्याची आई आणि अन्य एक नातेवाईक होते.

परंतु वाटेत अचानक मोठ्या जमावाने रुग्णवाहिका थांबविली आणि ती पेटवून दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी आणि परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.

गोळीबारात झाला होता जखमी

कांगचुप येथे आसाम रायफल्सच्या मदत छावण्यात असंख्य पीडित नागरिक राहत आहेत. चार जून रोजी सायंकाळी अचानक या भागात चकमक सुरू झाली. त्यामुळे संशयित दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात धुमश्‍चक्री सुरू झाली. यावेळी छावणीत राहणाऱ्या एका मुलाच्या डोक्याला गोळी लागली.

आसाम रायफल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या मुलाला तत्काळ इम्फाळला घेऊन घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या. यासाठी रुग्णवाहिका मागविली. आई बहुसंख्याक समुदायातील असल्याने जखमी मुलाला रस्ते मार्गाने इम्फाळच्या क्षेत्रिय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र सायंकाळी ६.३० च्या सुमारास इसोइसेम्बा येथे शेकडो नागरिकांनी रुग्णवाहिकेला अडविले आणि आग लावली. यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सापडले नसल्याचे सूत्राने सांगितले.

शहांच्या घरासमोर अचानक आंदोलन

गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानासमोर आज कुकी आदिवासी समुदायाच्या आंदोलकांनी आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. अमित शहा यांचे निवासस्थान कृष्ण मेनन रस्त्यावर आहे. या भागात कायम सुरक्षा दल तैनात असते.

परंतु आज सकाळी मणिपूरमधील कुकी समुदायातील काहीजण या परिसरात येऊन आंदोलन करू लागल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सध्या मणिपूरमध्ये दोन समुदायात संघर्ष सुरू आहे. अमित शहा यांना भेटण्याची त्यांची मागणी होती. काही वेळाने आंदोलकांपैकी काही जणांनी अमित शहा यांची निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT