Manipur Violence Sakal
देश

Manipur Violence : हिंसाचारामुळे जीवन-मरणाचा संघर्ष! कुकी समुदायाचे ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२’ वरील रास्ता रोको आंदोलन मागे

तरीसुद्धा मैतेई समुदायाने चुराचांदपूरच्या दिशेने होणारी वाहतूक अद्याप रोखलेलीच असल्याने तिथे जीवनावश्यक वस्तूंची भीषण टंचाई निर्माण झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Manipur Violence - मणिपूरमधील हिंसाचारामुळे औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची सर्वत्र भीषण टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील रुग्णांच्या वैद्यकीय समस्या वाढू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर कुकी समुदायाने ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२’ वरील रास्ता रोको आंदोलन मागे घेतले असले,

तरीसुद्धा मैतेई समुदायाने चुराचांदपूरच्या दिशेने होणारी वाहतूक अद्याप रोखलेलीच असल्याने तिथे जीवनावश्यक वस्तूंची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चुराचांदपूर हा मणिपूरमधील सर्वांत मोठा जिल्हा असून तिथे कुकी समुदायाचे प्राबल्य आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल चार लाख एवढी असून हिंसाचारामुळे दहा हजार लोकांना छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

राज्यात डॉक्टर आणि अन्य शल्य चिकित्सकांची भीषण टंचाई निर्माण झाली असून हे सगळे आता धोक्याच्या पातळीवर पोचले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डायलिसिससाठीची उपकरणे, कर्करोग आणि एचआयव्हीवरील उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे यांची टंचाई निर्माण झाल्याने त्यांचे विपरीत परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान पश्चिम इंफाळ आणि कांगपोकपी या जिल्ह्यांना लागून असलेल्या दोन खेड्यामध्ये झालेल्या हिंसाचारात एक नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. दोन गटांमध्ये सोमवारी ही चकमक झाल्याचे बोलले जाते.

गोळीबारात जखमी झालेले अधिक

चुराचांदपूरमध्ये चार लाख लोकसंख्येसाठी येथे सर्वांत मोठे रुग्णालय उभारण्यात आले असून शनिवारपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर येथे गोळीबारात जखमी झालेल्या तब्बल २८८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

राज्यामध्ये जातीय दंगली भडकल्यापासून गोळीबारामध्ये जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर केंद्र सरकारने या भागामध्ये डॉक्टरांची सहा पथके पाठविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Phule Scheme Fraud : खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले! महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनेतील बोगस बिलांची आता थेट 'SIT' मार्फत होणार चौकशी

IND vs NZ 1st Test Day 2 Live: ३२ वर्षांची प्रतीक्षा संपली! यशस्वी जैस्वाल-लोकेश राहुल यांनी सॉलिड सुरूवात करून दिली; दुसऱ्या दिवसाच्या खेळात नेमकं काय घडलं?

'इतके आळशी आणि बकवास लोक' प्रवीण तरडे इतर निर्मात्यांबद्दल बोलताना म्हणाले,'कोणताही सिनेमा आणून द्या 100 कोटी करुन दाखवतो'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा, भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात असल्याचे केले वक्तव्य

भाजप आमदाराला 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, अलिबाग न्यायालयाचा निर्णय; राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT