Manipur Violence
Manipur Violence Esakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा, कुकी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

इंफाळः मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती भागातील शहरामध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

वांगखेम सोमोरजित असे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा दले आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी चकमक झाली. या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या चौकीवर बॉम्ब फेकत गोळीबार देखील केला.

यानंतर सुरक्षा दलांनीही जशास तसे उत्तर देताना प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये जवळच उभ्या असलेल्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले. स्थानिक पोलिसांनी काही संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या भागातील कुकी दहशतवाद्यांच्या संघटना बिथरल्या आहेत. या भागातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे.

दरम्यान, मणिपूरमधील सुरक्षा दलांची शस्त्रे लुटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाच जणांविरोधात आरोपपत्र सादर केले आहे. ही घटना मे २०२३ मधील आहे. कामरूप येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर याप्रकरणी आरोपपत्र सादर करण्यात आले असल्याचे ‘सीबीआय’च्या प्रवक्त्याने सांगितले. याआधी या प्रकरणाचा तपास हा स्थानिक पोलिस करत होते पण आता मात्र हे प्रकरणी सीबीआयने स्वतःच्या ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT