Manipur Violence eSakal
देश

Manipur Violence: "पोलिसांनीच आम्हाला जमावाजवळ नेऊन सोडलं"; विवस्त्र करण्यात आलेल्या महिलाचां गंभीर आरोप

मणिपूरमधील घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

इंफाळ : महिलांना विवस्त्र करुन धिंड काढण्यात आल्याचा मणिपूरमधील भयानक व्हिडिओ समोर आल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणात आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेतील पीडित महिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Manipur Violence police were there and they took us to the mob Serious accusation of woman who was stripped)

मणिपूरमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामध्ये दोन महिलांपैकी एक २० वर्षीय तर दुसरी ४० वर्षीय महिला आहे. या दोघींना पुरुषांच्या जमावानं अत्याचार करुन विवस्त्र करत भर दिवसा रस्त्यावरुन धिंड काढली.

यावेळी त्यांचा विनयभंग देखील करण्यात आला आहे. ही ४ मे २०२३ रोजी घडली असल्याचं मणिपूर पोलिसांनी सांगितलं आहे. पण त्याची एफआयआर १८ मे २०२३ रोजी पोलिसांनी दाखल केली.

याप्रकरणी एका पीडितेनं आरोप केला की, "दुसऱ्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या अमानुषपणे सामुहिक अत्याचार करण्यात आला" (Latest Marathi News)

पोलीस स्टेशनपासून २ किमीवर घडली घटना

एफआयआरमध्ये पीडित महिलेनं म्हटलंय की, "कांगपोकपी जिल्ह्यातील त्यांच्या गावावर जेव्हा जमावानं हल्ला केला तेव्हा या महिला आपला जीव वाचवण्यासाठी आश्रयासाठी जवळच्या जंगलात शिरल्या.

या महिलांना नंतर थाऊबल पोलिसांनी वाचवलं आणि पोलीस ठाण्याकडं घेऊन निघाले. पण त्यांना रस्त्यातच जमावानं अडवलं आणि या महिलांना त्या जमावानं पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं" यावेळी पोलीस स्टेशन केवळ दोन किमी अंतरावरच होतं. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनीच आम्हाला जमावाजवळ सोडलं

दरम्यान, या पीडित महिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी फोनवरुन बोलताना आपली आपबिती सांगितली. यांपैकी २० वर्षीय पीडितेनं आरोप केला की, "जेव्हा जमावानं आमच्या गावावर हल्ला केला तेव्हा पोलीस तिथं हजर होते.

यावेळी पोलिसांनी आम्हाला आमच्या जवळच्या घरातून सोबत घेतलं आणि गावातील एका चिंचोळ्या रस्त्यानं पुढे नेत आम्हाला मुख्य रस्त्यावर त्या जमावाजवळ सोडून दिलं. आम्हाला पोलिसांनीच त्यांच्याजवळ सोडलं होतं" (Marathi Tajya Batmya)

तिसऱ्या एका महिलेला विवस्त्र केलं

एफआयआरमध्ये पीडितेनं म्हटलंय की, "त्या घटनवेळी आम्ही पाच लोक एकत्र होते. व्हिडिओमध्ये दोन महिला दिसत आहेत पण यामध्ये आणखी एक ५० वर्षीय महिला होती. तिला देखील जवामानं विवस्त्र केलं.

तसेच २० वर्षीय पीडित तरुणीच्या वडिलांना आणि भावाला त्या जमावानं ठार मारलं. अशा प्रकारे जेव्हा आमच्या सोबत असलेले सर्व पुरुष मारले गेले तेव्हा जमावानं त्यांना जे करायचं ते केलं.

तिथं फक्त आम्हीच उरलो होतो त्यानंतर आम्ही तिथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ काढला जात असल्याचं आम्हाला माहिती नव्हतं. मणिपूरमध्ये इंटरनेट बंद असल्यानं आम्हाला याची माहिती कळाली नाही"

जमावात पीडितेच्या भावाचा समावेश

पण या जमावामधील अनेक जणांना तक्रारदार पीडित महिलेनं ओळखलं आहे. यामध्ये एक तरुण असा होता की जो पीडितेच्या भावाचा मित्र होता. म्हणजेच पीडितेच्या भावाच्या मित्राचाही या भयानक घटनेत सहभाग होता, हे समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT