Manipur Violence Rahul Gandhi statement Violence is not way We will do our best for peace congress politics sakal
देश

Manipur Violence : हिंसाचार हा मार्ग नव्हे; शांततेसाठी सर्वतोपरी मदत करू - राहुल गांधी

राहुल यांनी आज मणिपूरच्या राज्यपाल अनसूया उइके यांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : हिंसाचाराच्या ज्वाळांमध्ये होरपळणाऱ्या मणिपूरवर फुंकर घालताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाजातील सर्वच घटकांना शांततेचे आवाहन केले आहे. हिंसाचार हा काही मार्ग असू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल यांनी आज मणिपूरच्या राज्यपाल अनसूया उइके यांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले. मणिपूरमधील हिंसाचार ही मोठी शोकांतिका असून राज्य आणि देशासाठी ही अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

शांती हाच पुढे जाण्याचा मार्ग असू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आता शांततेबाबत आणि पुढे मार्गक्रमण करण्याबाबत चर्चा करायला हवी. आता मी येथे आलो असून राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी कोणत्याही मार्गाने मदत करायला तयार आहे असे गांधी यांनी राजभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

‘मी मणिपूरमधील लोकांचे दुःख जाणून घेतले. खरोखरच ही एक भीषण शोकांतिका आहे. मणिपूरमधील लोकांसाठी ही बाब अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायी असून समस्त देशवासीयांना देखील यामुळे तितकेच दुःख होते आहे,’ असे राहुल यांनी सांगितले.

सोयी-सुविधांमध्ये सुधारणा हवी

राहुल यांनी इंफाळ, चुराचांदपूर आणि मोईरांग येथील मदत छावण्यांना भेट देत विविध समाजघटकांशी संवाद साधला.

या छावण्यांमधील मूलभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने मी केंद्र सरकारकडे करत आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारायला हवा. लोकांना औषधे दिली जावीत. याबाबत लोकांकडून खूप तक्रारी ऐकायला मिळाल्या आहेत असे गांधी यांनी सांगितले.

एनजीओंशी संवाद साधला

राहुल यांनी मणिपूरमधील विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. विष्णूपूर जिल्ह्यातील मोईरांग येथील दोन मदत छावण्यांना राहुल यांनी भेट दिली. ते इंफाळ येथून हेलिकॉप्टरने मोईरांगला रवाना झाले होते. येथील मदत छावण्यांमध्ये तब्बल एक हजार लोकांचे वास्तव्य आहे.

स्मारकाला भेट

राहुल यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह, पक्षाचे संघटन सचिव के.सी.वेणुगोपाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केईशाम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजोयकुमार हे उपस्थित होते.

भारतीय लष्कराच्या युद्ध स्मारकालाही त्यांनी भेट देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी नेताजींनी १९४४ मध्ये तिरंगा फडकावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT