Manipur Violence cm N. Biren Singh sakal
देश

Manipur Violence : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने हटवा; विरोधी पक्षांची अमित शहांकडे मागणी

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले असून त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. तब्बल दोन महिन्यांनंतर केंद्र सरकारने या मुद्यावरून विरोधकांशी संवाद साधला.

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेसकडून मणिपूरचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, ‘आप’चे खासदार संजय सिंह, ‘द्रमुक’चे खासदार तिरुची शिवा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, ‘माकप’चे खासदार जॉन ब्रिटास आणि समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव हे सहभागी झाले होते.

बैठकीच्या सुरूवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिली. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग स्थापन करण्यात आला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी ५० सदस्यांची समितीही स्थापण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असा विश्वास शहा यांनी सर्व पक्षांच्या सदस्यांना दिला. दिल्लीमध्ये ही बैठक सुरू असतानाच मणिपूरमध्ये एका मंत्र्यांच्या गोदामाला आग लावण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री निष्क्रिय

गृहमंत्र्यांच्या बैठकीतील निवेदनावर विरोधी पक्षांच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. मणिपूरची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून या राज्यात कायद्याचे राज्य उरलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदा निष्क्रिय असलेल्या मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली.

याबाबत गृहमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन देणे टाळले. काँग्रेसचे नेते इबोबी सिंह यांनी आपल्याला बोलूच दिले नसल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी लोकांचा विश्वास गमावल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT