manish sisodia sakal
देश

मनीष सिसोदिया यांच्या सुटकेसाठी ‘या’ मुख्यमंत्र्यांचं थेट पंतप्रधाना पत्र Manish Sisodia

रुपेश नामदास

मद्य घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा पाठिंबा मिळाला आहे. DMK मुनेत्र कळघम (DMK) नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सिसोदिया यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. स्टॅलिनचे हे पाऊल त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला होता, याआधी सिसोदिया यांच्या अटकेविरोधात विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रापासूनही काँग्रेसने भूमिका घेतली नाही.

पत्रात काय लिहिले?

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात स्टॅलिन म्हणाले की, "दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी अटक केल्याचं समजल्यावर मला दुःख आणि निराशा झाली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, फौजदारी न्याय व्यवस्थेची सर्व तत्त्वे वाऱ्यावर सोडली आहेत आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या वैयक्तिक समाधानासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेचा गैरवापर केला गेला आहे.

त्यांच्या सुटकेची मागणी करताना स्टॅलिन यांनी लिहिले की, "मी तुम्हाला आवाहन करतो की, प्रमुख तपास यंत्रणा आणि घटनात्मक कार्यालये, विशेषत: केंद्रातील भाजपच्या गेल्या नऊ वर्षांच्या राजवटीत अबाधित राहिलेल्या राज्यपाल कार्यालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्व पावले उचलावीत. . मनीष सिसोदिया यांची बिनशर्त सुटका करा अशी मागणी त्यांनी केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Fall Incident : पुण्यातील विमाननगरमध्ये चालत्या गाडीवर कोसळलं गुलमोहराचं झाड; सुदैवाने जीवितहानी टळली, पण वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Latest Marathi News Live Update : दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजविण्याचे काम सुरू

नागपूरमध्ये ४५ बार बंद, परवाना शुल्कात वाढ झाल्याने मालकांवर आर्थिक ताण

Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' 3 मूलांकाचे लोक; पण व्यसन नाही, तर 'या' वाईट सवयीमुळे जीवनात यश मिळायला लागतो खूप उशिर

SCROLL FOR NEXT