viral video 
देश

Video: काय बोलावं आता! भर रस्त्यात नाचली 'मंजूलिका'; व्हिडिओ होतोय व्हायरल

Manjulika Viral Video: एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंजूलिका'च रस्त्यावर नृत्य करताना दिसत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नियम नाही. आजकाल लोक कुठेही रील बनवत आहेत. त्यासाठी लोक स्थळ-काळाचा काहीच विचार करत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मंजूलिका'च रस्त्यावर नृत्य करताना दिसत आहे.

रस्ता, मार्केट, मेट्रो, ट्रेन, ऑफिस कुठेही लोक रील्स बनवत आहेत. आसामच्या गुवाहाटीमध्ये एका महिलेने चक्क रस्त्यावर मंजूलिकाचे नृत्य केलं आहे. तरुणीने मंजूलिकाचा हुबेहुब मेकअप केला होता आणि नृत्य देखील मंजूलिका सारखा केला. गजबजलेल्या रस्त्यावर ती हा नृत्य करते. हे सर्व पाहून लोक अचंबीत होतात. काही यावर हसतात तर काहींना तरुणी वेडी झाल्याचं वाटलेलं असणार.

भूलभुलय्या या बॉलिवूड चित्रपटात विद्या बालनने मंजूलिकाचे नृत्य केलं आहे. हे नृत्य आणि गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी शिलॉन्गची असून ती एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचं नाव प्रीती थापा असल्याचं कळतंय. प्रीती थापा भर रस्त्यात काहीतरी विचित्र करताना दिसली. लोक देखील हैराण होते. हा काय प्रकार सुरु आहे असं त्यांना वाटून गेलं. लोकांनी तिला पाहण्यासाठी गर्दी देखील केली होती.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रीती थापा हिरव्या रंगाच्या साडीमध्ये आहे. तिने केस मोकळे सोडलेले आहेत. मंजूलिकाचा मेकअप केलेला आहे. ती भर रस्त्यात नृत्य करते. थापाने आपले इंस्टा अकाऊंट, @preetithapasoss वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रीती थापा हिचा व्हिडिओ पाहून अनेक जण यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

काही नेटकऱ्यांनी तिची थट्टा केली आहे. काही व्ह्युज मिळवण्यासाठी लोक काहीही करत आहेत. त्यातलाच हा एक भाग आहे, असं एकाने म्हटलं. ट्रॅफिकमध्ये अडचण निर्माण केल्याप्रकरणी एका नेटकऱ्याने प्रीतीला झापलं आहे. तर, एकाने हा व्हिडिओ पाहून मजा आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलं, मी तरुणीच्या आत्मविश्वासाला सलाम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

हा ट्रेक नव्हता... निसर्गाशी झालेली जिवंत झुंज होती! लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकचा अनुभव

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Jalgaon ACB Action : 'कॅल्क्युलेटर बाबा'च्या कार्यालयावर धाड! शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना 'भूमिअभिलेख'मधील दोघांना रंगेहाथ पकडले; जळगावातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT