Money e sakal
देश

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 वर्षांचा पगार

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली- गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. अशात सर्व उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेक खासगी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितही काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेताना दिसत आहेत. त्यातील एक आहे मॅनकाईंड फार्मा. कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पुढील पाच वर्ष त्याच्या पगाराइतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय कंपनी कुटुंबियांना तीन वर्षांपर्यंतचा विमा देणार आहे. (Mankind Pharma COVID Protection Policy To Support Families Deceased Employees)

मॅनकाईंड फार्मा कंपनीने एका स्कीम अंतर्गत विमा दिला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसदाराला 7 लाख रुपये दिले जाणार आहेत. माहितीनुसार, मॅनकाईंड फार्मा कंपनीमध्ये 14 हजार कर्मचारी आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. जुनेया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. कोरोना महामारीमुळे सर्वजण संकटात आहेत. अशात कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी आम्ही छोटा प्रयत्न करत आहोत, असं जुनेया म्हणाले.

कोरोना काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामवरुन कमी केलं. वर्षोंवर्षे एकाच कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. असे असताना काही कंपन्यांनी स्तुत्य निर्णय घेतले आहेत. टाटा स्टील कंपनीने कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्तीच्या वयापर्यंत पगार देणार असल्याचं जाहीर केलंय. टाटा मोटर्सनेही अशाच प्रकारची घोषणा केलीये. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT