Corona Test sakal
देश

चाचण्या, होम क्वारंटाइन रुग्णांबाबत केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी नऊ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हर्च्युअल पार पडली बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोना चाचण्या (Corona tests) आणि होम आयसोलेशनमध्ये (Home Isolations) उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत केंद्र सरकारनं राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना मंगळारी काही महत्वाच्या सूचना केल्या. व्हर्च्युअली पार पडलेल्या कोरोना संसर्गासंबंधीत या आढावा बैठकीत नऊ राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशाराही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandiviya) यांनी दिला. (Mansukh Mandviya given imp instuctions about corona tests and home isolaton patients to states)

मांडवीय यांनी राज्यांना कोरोनाच्या चाचण्या आणि लसीकरणाचा डेटा वेळेवर देण्याच्या सूचना केल्या तसेच ज्या राज्यांमध्ये चाचण्यांच प्रमाण कमी झालंय त्यांना चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सध्या लोक होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. अशा रुग्णांवर राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि चंदीगड या राज्यांचे आरोग्य मंत्री सहभागी झाले होते. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा तसेच दादरा-नगर हवेली, दीव-दमणच्या आरोग्य मंत्र्यांशी आणि मुख्य सचिवांशी चर्चा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT