update on resignation of Chief Minister N Biren Singh 
देश

Biren Singh: "मी फक्त तेव्हाच राजीनामा देणार जेव्हा..."; मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना धुडकावलं

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठरावही आणला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरु असून यामध्ये आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर महिलांवर अत्याचार आणि त्यांची विवस्त्र धिंड काढण्यासारखे भीषण प्रकारही घडले आहेत.

याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची मागणी धुडकाऊन लावत आपण तेव्हाच राजीनामा देऊ जेव्हा केंद्रातील नेतृत्व आपल्याला आदेश देईल, असं त्यांनी म्हटलं आहे. (Manupur Violence Will Biren Singh resign from CM Post need to know)

CM बिरेन सिंह म्हणाले, मी लोकांनी निवडून दिलेला मुख्यमंत्री आहे. पक्षानं अजून मला पदावरुन दूर होण्यास सांगितलेलं नाही. त्यामुळं मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर राज्यातील बिकट परिस्थितीला बिरेन सिंह यांनी बेकायदा स्थलांतरीत लोक आणि तस्करांना जबाबदार धरलं आहे.

मणिपूर गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून जळत आहे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी मुख्यंमत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नुकतेच मणिपूरमधील दोन कुकी समाजाच्या महिलांची विवस्त्र काढलेल्या धिंड प्रकरणावरुन तर देशातील जनतेनं मोठा संताप व्यक्त केला आहे. त्यामुळं बिरेन सिंह यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव वाढत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, मणिपूरच्या प्रश्नावरुन बुधवारी संसदेत केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर का जळतंय याबाबत संसदेत निवेदन करावं आणि संपूर्ण दिवसभर या विषयावर सांगोपांग चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शहा याबाबत दोन्ही सभागृहात निवेदन द्यायला तयार आहेत. पण ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे त्यामुळं ते आपल्या जबाबदारीपासून पळू शकत नाहीत, त्यांनी दोन्ही सभागृहात देशाला या विषयावर संबोधित करावं म्हणून विरोधकांनी रान पेटवलं आहे. यामुळं गेल्या तीन दिवस संसदेचं कामकाज होऊ शकलेलं नाही. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT