rahul shewale on shivsena leaving nda and bjp  alliance maharashtra politics
rahul shewale on shivsena leaving nda and bjp alliance maharashtra politics  
देश

शिवसेना-भाजप युतीसाठी अनेकदा प्रयत्न झाले पण...; शेवाळेंचे गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या १२ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांनी युतीबाबत एकामागून एक गौप्यस्फोट केले. यामध्ये चार ते पाच वेळा शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं ती होऊ शकली नाही, असा दावा शेवाळे यांनी केला.

शेवाळे म्हणाले, जेव्हा आम्हा सर्व खासदारांना २१ जून रोजी उद्धव ठाकरेंनी वर्षावर बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी आम्ही शिवसेनेसोबत असू असं स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर आम्ही हे ही सांगितलं की, २०१९ ची निवडणूक आम्ही शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून लढवली आहे. पण आता महाविकास आघाडीसोबत असल्यानं दोन-अडीच वर्षात आम्हाला फार त्रास होतोय. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आमची भूमिका मान्य केली आणि आम्हाला म्हणाले की, भाजपनं जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर मी त्याचं स्वागत करेन असं ते आमच्या सर्व खासदारांसमोर म्हणाले. या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे देखील उपस्थित होते.

पण ज्यावेळी दुसरी बैठक झाली तेव्हा आम्ही हाच मुद्दा मांडला की, २०२४ मध्ये जर निवडणूक लढवायची असेल तर युती करणं अत्यंत महत्वाचं आहे. लोकांची ही मागणी आहे आणि मतदारांचीही हीच मागणी आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी वारंवार याच गोष्टीचा उल्लेख केला की, येणारी निवडणूक आपण महाविकास आघाडीमार्फत लढवूयात. पण प्रत्येक खासदारानं लोकसभा मतदारसंघाच्या अडचणी अरविंद सावंत यांच्यासमोर मांडल्या. अरविंद सावंत यांनी ही भूमिका मान्य करुन उद्धव ठाकरेंसमोर ठेवली.

जर आपल्याला एनडीएसोबत जायचं असेल तर आपल्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीच्या उमेदवारांना मतदान केलं तर आपल्याला एनडीएसोबत जाण्याचं मोठं पाऊल ठरेल. यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं की, मला पण युती करायची आहे. मी यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण जेव्हा मी पंतप्रधान मोदींना दिल्लीला भेटायला गेलो तेव्हा या भेटीत या गोष्टीचा उल्लेख केला. पण त्यानंतर जूनमध्ये ही बैठक झाल्यानंतर जुलैमध्ये अधिवेशनात १२ भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. पण त्यावेळी भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाला वाटलं की, एकीकडे आपल्याशी युतीचं बोलणं होत आणि दुसरीकडं बारा आमदारांवर कारवाई होते. त्यामुळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून नाराजी झाली. त्यामुळं कित्येक वेळा चर्चा झाल्यानंतरही पॉझिटिव्ह प्रतिसाद न मिळाल्यानं भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज होते. आता मी माझ्याकडून अनेकदा युतीसाठी प्रयत्न केले आणि तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करुन पाहा, असंही उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं. यानंतर मी चार पाच खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांना भेटलो. पण आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यानं ती झाली नाही, असं खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT