World Old Watch  esakal
देश

World Old Watch : OMG! हे आहे जगातील सर्वात जुनं घडयाळ, ५ विमाने खरेदी करता येतील एवढी आहे किंमत

स्टाईल स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या घड्याळाची क्रेझ अनेकांना असते

सकाळ डिजिटल टीम

Pomander Watch 1505 : स्टाईल स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या घड्याळाची क्रेझ अनेकांना असते. मग अशांसाठी बाजारात विविध ब्रँड उपलब्ध असतातच. जगातील सर्वात चांगल्या ब्रँडचे घड्याळ आपल्या मनगटावर असावं अशी इच्छा घड्याळाची आवड असणाऱ्या प्रत्येकाची असते. पण मनगटावर घड्याळ बांधताना असा प्रश्न पडला का ओ तुम्हाला की, जगात पहिलं घड्याळ कधी अस्तित्वात आलं? किंवा मग जगातील सर्वात महागडे घड्याळ कोणतं असेल तर जगात असं एक घड्याळ आहे, ज्याची किंमत इतकी आहे की त्या रकमेत 4-5 विमाने खरेदी करता येतात.

हे घड्याळ 'पोमेंडर वॉच ऑफ 1505' किंवा 'वॉच 1505' म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात की हे जगातील पहिलं घड्याळ आहे, जे जर्मन सायंटिस्ट पीटर हेनलिन यांनी बनवलं होतं. हे घड्याळ 1505 मध्ये बनविण्यात आल्याचं सांगितलं जातं. जगातील सर्वात पहिलं घड्याळ सफरचंदासारखं दिसायला आहे. 1987 मध्ये, एका व्यक्तीने लंडनमधील फ्ली मार्केटमधून 10 पौंडांना हे घड्याळ विकत घेतले. पण त्याला या घड्याळाची किंमत काय आहे हे माहित नव्हते. नंतर त्याने ते घड्याळ दुसऱ्याला विकलं. मग ती विकत घेणार्‍याने दुसर्‍याला विकलं. हे विकण्याचं सत्र सुरूच राहिलं, पण कोणालाच त्याची खरी किंमत माहिती नव्हती.

कालांतराने हे घड्याळ जुन्या गोष्टींवर संशोधन करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पडलं. त्याने पाहिलं की घड्याळावर त्याचा शोधक पीटर हेनलिनचे चिन्ह आहे आणि त्याच्या शोधाचे वर्ष देखील त्यावर लिहिलेले आहे. त्यानंतरच या घड्याळाची नेमकी किंमत कळू शकली.

कॉपर (तांबे) आणि सोन्यापासून बनवलेल्या या घड्याळाच्या किंमतीबद्दल 2014 मध्ये, अमेरिकेच्या अँटिक वीक मासिकाने अंदाज व्यक्त केला होता की आजच्या काळात याची किंमत 50 ते 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 413 कोटी ते 661 कोटी रुपये असू शकते. या किमतीत 4-5 खाजगी जेट आरामात खरेदी करता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT