Naxal
Naxal e sakal
देश

नक्षलवाद्यांकडून पाच ग्रामस्थांचे अपहरण, बारावीच्या विद्यार्थिनीचाही समावेश

सकाळ डिजिटल टीम

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा (Sukma) जिल्ह्यातील एका गावातील पाच जणांचे नक्षलवाद्यांनी (maoist) अपहरण केले. यामध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलीचा देखील समावेश आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहिम सुरू केली आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या कोन्टा पोलिस ठाण्यापासून जंगलात १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बातेर गावात घडली. प्राथमिक माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा एक गट शनिवारी संध्याकाळी गावात पोहोचला आणि त्यांनी बारावीच्या मुलीसह पाच गावकऱ्यांना जबरदस्तीने सोबत नेले. रविवारी दुपारी अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, असे सुकमाचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा यांनी पीटीआयला सांगितले.

ग्रामस्थांचे अपहरण का करण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. सर्व आदिवासी समाज ही बस्तर प्रदेशातील आदिवासी समुदायांची एक संस्था आहे. त्यांनी अपहरण केलेल्या ग्रामस्थांना सोडण्याची विनंती नक्षल्यांना केली आहे. जुलैमध्ये नक्षलवाद्यांनी जगरगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंदेड येथून आठ गावकऱ्यांचे अपहरण केले होते आणि दोन ते तीन दिवसांनी त्यांची सुटका केली होती, असे शर्मा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT