Security personnel stand at the encounter site after eliminating eight Naxalites, including a Maoist commander

 

esakal

देश

Maoist Commander Killed : तब्बल एक कोटींचा इनाम असलेल्या माओवादी कमांडरसह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा!

Eight Naxalites killed including a Maoist commander : ही कारवाई कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली.

Mayur Ratnaparkhe

Security Forces Eliminate Eight Naxalites in Encounter : झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक प्रमुख माओवादी कमांडर अनल दा उर्फ ​​तुफान ठार झाला. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच, या चकमकीत आठ माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

ही कारवाई कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने केली. गुरुवारी सकाळी पश्चिम सिंहभूममध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. किरीबुरु पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारंडा जंगलातील कुमडी येथे ही चकमक झाली. जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये अनल दा याच्यासह आठ माओवादी ठार झाले.

अनल दा उर्फ ​​तुफानचे खरे नाव पतिराम मांझी उर्फ ​​पतिराम मरांडी उर्फ ​​रमेश होते. तो गिरिडीह जिल्ह्यातील पिरतांड पोलिस स्टेशन परिसरातील झरबाले गावचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव टोटो मरांडी उर्फ ​​तारू मांझी होते. अनल दा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) किंवा सीपीआय (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) होता.

 त्याला माओवादी रणनीतीकार मानले जात होते, तो संघटनेसाठी प्रमुख योजना आखत होतो. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अनल दा ठार होणे हे सुरक्षा दलांसाठी हे एक मोठे यश आणि माओवाद्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robotic Surgery: रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमके काय? कोणत्या आजारांमध्ये याचा वापर होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

Kannad Elections : सायगावमध्ये थरार; दोन पिस्तूलसह गोळीबार करणाऱ्या तरुणाला बर्दापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune Crime : प्रेमसंबंधाच्या वादातून पुण्यात तरुणावर शस्त्राने वार, एक अटकेत

MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?

Pune Grand Tour 2026 : पुणे ग्रँड टूर २०२६: वाहतुकीत बदल, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

SCROLL FOR NEXT