Hardik Patel
Hardik Patel 
देश

पटेल आरक्षणाचा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना फटका; भाजपचे मोहरे पराभवाच्या उंबरठ्यावर 

वृत्तसंस्था

अहमदाबाद : हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनाच्या धगीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो. आज (सोमवार) सकाळी 9.30 पर्यंत आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, रुपानी आणि नितीन पटेल हे दोघेही त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. 

गुजरातमध्ये काँग्रेसने यंदा जबरदस्त धडक दिली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्या 'होम ग्राऊंड'वर काँग्रेसने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारली होती. काही काळ भाजपला चक्क पिछाडीवर जावे लागले होते. सकाळी 9.30 पर्यंत बदललेल्या कलानुसार भाजपने पुन्हा आघाडी घेतली होती. 

या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री रुपानी आणि उपमुख्यमंत्री पटेल हे भाजपचे दोन मोहरे पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गुजरातची मागील निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली होती. 2014 मध्ये मोदी पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर गुजरातची धुरा आधी आनंदीबेन पटेल आणि नंतर विजय रुपानी यांच्याकडे सोपविण्यात आली. 

याच सुमारास पाटीदार आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाचा फटका रुपानी आणि पटेल या दोघांनाही बसल्याचे मतमोजणीच्या सुरवातीच्या टप्प्यातून दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT