Sonia Gandhi
Sonia Gandhi 
देश

सोनिया गांधींची सक्रीय राजकारणातून 'एक्झिट' ?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या 19 वर्षांपासून काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सोनिया गांधी यांनी आता पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या पदावर आता त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड झाली आहे. राहुल गांधी उद्या (शनिवार) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी सोनिया गांधींनी ''माझी भूमिका, माझे नेतृत्त्व निवृत्त होत आहे'', अशा शब्दांत काँग्रेससह सक्रीय राजकारणातून 'एक्झिट' घेणार असल्याचे संकेत दिले, असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील आणि राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहास्तव सोनिया गांधी आत्तापर्यंत पदावर होत्या. मात्र, आता प्रकृती अस्वस्थतेमुळे सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहेत. पक्षातून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, या पदासाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर वर्णी लागणार हे निश्चित मानले जात होते. 

राहुल गांधींनी जानेवारी 2013 मध्ये काँग्रेस उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर आता त्यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, 11 डिसेंबरला राहुल गांधींची अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. त्यामुळे आता ते उद्या (शनिवार) अधिकृतपणे पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. तत्पूर्वी सोनिया गांधींनी हे विधान केल्याने त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासह सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT