Mumbai High Court eSakal
देश

Mumbai High Court : 'वेडी आहेस' म्हणणं अपमान नाही, हायकोर्टाची टिप्पणी; घटस्फोट प्रकरणात पत्नीला दिली समज

Bombay HC : आपल्या पतीवर निराधार आरोप करणं ही क्रूरता असल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केलं.

Sudesh

जर घरामध्ये सर्व जण मराठी बोलणारे असतील, तर तिथे एखाद्या व्यक्तीला 'तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस' असं म्हणणं साधारण बाब आहे. असं म्हटलं जाणं क्रूरता किंवा अपमान नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एका घटस्फोटाच्या प्रकरणात कोर्टाने ही टिप्पणी केली.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या संयुक्त खंडपीठासमोर एका घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एका महिलेने आपल्या पतीवर असा आरोप केला होता, की वरील शब्दांमध्ये पतीने तिचा अपमान केला आहे. या आधारे तिने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कोर्टाने यावर सुनावणीवेळी म्हटलं, की संबंधित महिलेने आपला अपमान झाल्याचा दावा केला आहे. तसंच, 'तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस', अशा शब्दांमध्ये आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही पत्नीने केला आहे. मात्र, एका मराठी घरामध्ये हे शब्द वापरले जाणं साधारण बाब आहे. याचा हेतू अपमान करणे हाच आहे हे स्पष्ट केलं जाऊ शकत नाही.

या महिलेने आपला दावा सिद्ध करण्यासाठी इतर माहिती दिली नाही. तसंच, वरील शब्द कोणत्या परिस्थितीमध्ये म्हटले गेले होते याबाबत देखील तिने स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत तिने आपल्या पतीवर निराधार आरोप करणं ही क्रूरता असल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केलं.

दोघांचे एकमेकांवर आरोप

या महिलेने आपल्या पतीवर असे आरोप केले होते, की तो रात्री उशीरा घरी येत होता आणि आपल्याला शिवीगाळ करून मारहाण करत होता. यामुळे तिने पतीची पोलिसांत देखील तक्रार दाखल केली होती. मात्र, आपले आरोप सिद्ध करणारी कोणतीही गोष्ट ती सांगू शकली नव्हती.

दुसरीकडे पतीनेही पत्नीवर आरोप केले आहेत. 2007 साली लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच पत्नीने मोठ्या प्रमाणात भाडणं करण्यास सुरुवात केली होती. ती आपल्या आई-वडिलांचाही आदर करत नव्हती. तसंच, एकत्र कुटुंबात रहायचं नाही म्हणून ती आपल्या माहेरी देखील निघून गेली होती. तिने केलेल्या पोलीस तक्रारीमुळे आपली आणि कुटुंबीयांची इभ्रत देखील गेली असल्याचं पतीने म्हटलं आहे.

हा पती 2012 साली स्थानिक नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा होता. 2013 साली त्याच्याविरोधात पत्नीने केलेल्या तक्रारीमुळे त्याची बदनामी झाली. कोणताही पुरावा किंवा आधार नसताना पत्नीने केलेलं हे कृत्य म्हणजे क्रूरता असल्याचंही कोर्टाने यावेळी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT