देश

पतीच्या इशाऱ्यानंतरही परपुरुषाला अपरात्री फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रूरपणा: हायकोर्ट

सकाळ डिजिटल टीम

केरळ हायकोर्टाने अलिकडेच एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर करताना म्हटलंय की, पतीने दिलेल्या इशाऱ्याला दुर्लक्षित करुन एका पत्नीकडून एखाद्या दुसऱ्या पुरुषाला गुप्तपणे फोन कॉल करणे हा प्रकार वैवाहिक क्रूरतेसारखाच आहे. न्यायाधीश कौसर एडप्पागथ यांनी आपल्या आदेशामध्ये असंही म्हटलंय की, जोपर्यंत वैवाहिक जीवन पूर्ववत होत नाही, तोपर्यंत केवळ तडजोड करणे म्हणजे क्रूरतेचं समर्थन होणार नाही. (Keral HighCourt)

पतीच्या वारंवार इशाऱ्यानंतरही त्याची अवहेलना करत पत्नीद्वारे एखाद्या अन्य पुरुषाला वारंवार संधी पाहून कॉल करणे, ते ही उशीरा रात्री हा वैवाहिक क्रूरतेसारखाच प्रकार आहे.

या प्रकरणी हायकोर्टाच्या समक्ष पतीने याचिका दाखल करुन फॅमिली कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. पतीने व्यभिचार आणि क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करुन फॅमिली कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, त्याची ही याचिका फेटाळली गेली होती.

पतीने असा दावा केला होता की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पत्नीने त्याच्या आयुष्याला एकप्राकरे नर्क बनवून अनेक प्रकारची अनैतिक कृत्ये केली आहेत. त्याने असाही आरोप केला की त्याच्या पत्नीचे लग्नाआधी दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते, जे लग्नानंतरही तसेच सुरु राहिले.

पतीकडून बाजू मांडणारे वकील टी.एन.रमन कार्था यांनी पुढे म्हटलंय की, BSNL कडून प्राप्त झालेल्या सीडीच्या प्रिंटआऊटवर लक्ष दिल्यास असं दिसून येतंय की पत्नी आणि परपुरुषासोबत सातत्याने फोन कॉल्स झाले आहेत, जे एका अनैतिक संबंधांकडे इशारा करतात.

मात्र, पत्नीकडून बाजू मांडताना वकिल एम.बी. संदीपने या दाव्याचं खंडन करत म्हटलंय की, ती कधीतरीच एखाद्या विशेष वेळी त्या व्यक्तीला फोन करत होती.

मात्र, कोर्टाने असं म्हटलंय की, फक्त ती फोन करत होती यावरुन त्यांच्यातील नाते अनैतिक अथवा चुकीचे संबंध होते, असं ठरत नाही. मात्र, पतीच्या वारंवार इशाऱ्यानंतरही त्याची अवहेलना करत पत्नीद्वारे एखाद्या अन्य पुरुषाला वारंवार संधी पाहून कॉल करणे, ते ही उशीरा रात्री हा वैवाहिक क्रूरतेसारखाच प्रकार आहे, असं न्यायालयाने म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT