देश

बॉयफ्रेंडची पोलिसांकडे तक्रार करायला गेली अन् लग्न करूनच आली

सोशल मीडियावर रंगलीये या लग्नाच्या चर्चा

सकाळ डिजिटल टीम

प्रेम म्हटलं की त्यात रुसवे-फुगवे आलेच. अनेकदा हे वाद किरकोळ स्वरुपाचे असतात. तर, काही वेळा ते गंभीरही होतात. मात्र, अशाच एका किरकोळ कारणावरुन वाद झाल्यामुळे एका तरुणीने थेट पोलिस स्टेशन (police station) गाठत प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी या दोघांमधील मतभेद दूर करत त्यांचं पोलिस स्टेशनमध्येच लग्न (marriage) लावून टाकलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. (marriage of couple in police station video goes viral)

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी येथे हे अनोखं लग्न पार पडलं आहे. २२ वर्षीय एक तरुणी आणि तिचा प्रियकर मोतीलाल यांचं किरकोळ कारणावरुन वाद झाले. ज्यामुळे रागाच्या भरात या युवतीने थेट पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी या तरुणीची व मोतीलालची समजूत काढली आणि त्या दोघांचाही रुसवा दूर करत पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या मंदिरात त्यांचं लग्न लावून टाकलं.

दरम्यान, मोतीलाल व त्याच्या प्रेयसीमधील वाद मिटल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी बोलवण्यात आलं आणि घरच्यांच्या संमतीने हा लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नात एका पत्रकाराने भटजींची भूमिका पार पाडली. तर, पोलिस स्टाफमधील काही जण पाहुणे झाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT