court3 
देश

विवाहितेलाही मिळू शकते आई-वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर अनुकंपा नोकरी- हायकोर्ट

सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या आई-वडिलांचा नोकरीचा कालावधी शिल्लक असताना अकाली मृत्यू झाला असेल, तर अशावेळी लग्न झालेल्या मुलीला देखील अनुकंपा तत्वावरील नोकरीवर हक्क असेल. मध्य प्रदेश हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना सोमवारी हा महत्त्वाचा आदेश दिला आहे. कोर्टाने मुलींच्या बाजूने निर्णय देताना म्हटलं की, लग्न झालेल्या मुलाची अनुकंपा नियुक्ती होत असेल तर मुलींची का नाही होऊ शकत? हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं की, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा नोकरीचा कालावधी शिल्लक असताना अकाली मृत्यू झाला, तर अनुकंपा जागेसाठी मुलगाच नाही तर मुलगीही अर्ज दाखल करु शकते. तिचं लग्न झालं असल्याने यात कोणताही फरक पडू शकत नाही.  हायकोर्टाचा हा निर्णय भविष्यात अनुकंपा तत्वावर नोकरी करु पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरु शकतो. सर्वसाधारणपणे अनुकंपा नोकरीसाठी विवाहित मुलीला गृहीत धरलं जात नाही. 

प्रीती सिंह या महिलेने जबलपूर हायकोर्टामध्ये जनहीत याचिका दाखल केली होती. आपल्या वकीलांमार्फेत त्यांनी आपली बाजू मांडत सांगितलं होतं की, त्यांची आई मोहिनी सिंह जेव्हा कोलिगंवा पोलिस स्टेशनमध्ये ASI म्हणून नियुक्त  होती, तेव्हा २०१४ मध्ये त्यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रीती सिंहने आपल्या आईच्या जागी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. पण, भोपाळ पोलिस मुख्यालयाने त्यांचा अर्ज नाकारला होता. त्या विवाहित आहेत, त्यामुळे त्यांचा अनुकंपा नोकरीवर अधिकार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. 

प्रीती सिंह यांनी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संजय द्विवेदी यांच्यासमोर सुनावणीदरम्यान वकीलांनी आपल्या आशीलाच्या बाजूने युक्तीवाद करताना म्हटलं की, 'भारतीय संविधानाच्या कलम-१४ मध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. असे असताना अनुकंपा नोकरीमध्ये असा भेदभाव का केला जातो. विवाहित पुरुषाला अनुकंपा नोकरी दिली जाते, मग विवाहित महिलेला ती का दिली जात नाही?'

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने वकीलाचा युक्तीवाद योग्य असल्याचं म्हटलं. तसेच प्रीती सिंह या महिलेला अनुकंपा नोकरी देण्याचा आदेश दिला. आदेशात म्हणण्यात आलंय की, महिलेचे लग्न झाले असले तरी तिला अनुकंपा नोकरी दिली जावी. कोर्टाचा हा निर्णय अनेक महिलांसाठी फायद्याचा ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: तेलाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 900 अंकांनी खाली; कोणते शेअर्स तोट्यात?

Maharashtra land law: राज्यात जुलैपासून ‘जमीन मालकी हक्क कायदा’: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य!

Gold Rate Today: 1 वर्ष सोने खरेदी टाळा! मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या बाजारात खळबळ; जाणून घ्या आजचा भाव

IPL 2026: सलग पराभवानंतर पंजाब किंग्ज अडचणीत; दिल्लीविरुद्ध ‘करो या मरो’ लढत,पहा कशी असेल Playing 11

'मुलगी आली हो...' प्रसाद ओकच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT