Martyr Pilot Ninad Mandavganes two years old daughters expresions on his funeral
Martyr Pilot Ninad Mandavganes two years old daughters expresions on his funeral 
देश

Martyr Ninad Mandavgane : हुतात्मा निनाद यांची मुलगी आपल्या वीर बाबांना अखेरचा निरोप देताना (व्हिडीओ)

सकाळन्यूजनेटवर्क

नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. याठिकाणी जेव्हा हुतात्मा निनाद यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक होऊन गेले होते. आपल्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी कसा सॅल्युट करायचा, हे आपल्या दोन वर्षाच्या मुलीला सांगतानाचा क्षण तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता.

श्रीनगर विमानतळावरून बुधवारी सकाळी 10 वाजता उड्डाण घेतलेले एमआय-17 व्ही 5 बनावटीचे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दहा मिनिटांतच कोसळले. या अपघातात पायलटसह सहाजण हुतात्मा झाले. त्यात नाशिकच्या उपनगरजवळील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीत राहणारे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हे हुतात्मा झाले. नाशिकमधील अमरधाम येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येेत आहेत. 
 

  • हुतात्मा स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांची दोन वर्षाची मुलगी आपल्या वीर बाबांना अखेरचा निरोप देताना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT