Nagaland Accident Video eSakal
देश

Nagaland Accident : काळ बनून आला दगड; एका क्षणात तीन गाड्यांना जागीच चिरडलं! भीषण Video Viral

अवघ्या पाच सेकंदात हे सगळं झालं.

Sudesh

नागालँडच्या दीमापुर जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण दुर्घटना घडली. दरड कोसळल्यामुळे घाटात उभ्या असल्या तीन गाड्यांना एका मोठ्या दगडाने जागीच चिरडलं. कोणाला काही कळण्यापूर्वीच या गाड्यांचा चुराडा झाला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या गाडीवर सगळ्यात आधी दगड कोसळला त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शेजारच्या गाड्यांमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अवघ्या पाच सेकंदात हे सगळं झालं. या घटनेचा व्हिडिओ मागे उभ्या असलेल्या कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या व्हिडिओची पुष्टी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना उपचारांसाठी आवश्यक ती मदत देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्ण हायवेवर जिथे धोकादायक वळणं आणि ठिकाणं आहेत तिथे सुरक्षा कड्यांना मजबूत करण्यासाठी राज्य सरकार केंद्रासोबत मिळून प्रयत्न सुरू ठेवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT