Vaishno Devi
Vaishno Devi Google file photo
देश

वैष्णो देवी मंदिर परिसरात भीषण आग; आकाशात धुराचे लोट

वृत्तसंस्था

गर्भगृहाशेजारी असलेल्या रोकड मोजणीच्या खोलीला भीषण आग लागल्याने या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णो देवी (Vaishno Devi) मंदिराच्या संकुलात भीषण आग लागली होती. मंदिराच्या आवारातील कालिका भवनजवळील काउंटर क्रमांक दोनजवळ ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असून आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त मिळाले आहे. ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणाहून नैसर्गिक गुहेचे अंतर सुमारे शंभर मीटर एवढं आहे. (Massive fire at Vaishno Devi shrine in Jammu no injuries reported yet)

मिळालेल्या माहितीनुसार, नैसर्गिक गुहेपासून सुमारे शंभर मीटर अंतरावर आग लागली होती. व्हीआयपी गेटजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काही वेळातच आगीने भयानक रुप धारण केले होते. त्यामुळे भैरो घाटीपर्यंत धुराचे लोट दिसत होते. गर्भगृहाशेजारी असलेल्या रोकड मोजणीच्या खोलीला भीषण आग लागल्याने या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

दरमहा लाखो भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जातात. यंदा कोरोनामुळे सर्व प्रकारच्या यात्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे तेथे लोकांची उपस्थिती खूप कमी होती. वैष्णो देवी मंदिर संकुल परिसरात मोठ्या संख्येत इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

एस. चरणदीप सिंग यांच्याकडून वैष्णोदेवी मंदिराजवळ लागलेल्या आगीची माहिती घेतली. काही वेळातच सर्व काही नियंत्रणात आणण्यात आले. अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. घटनास्थळावरील प्रत्येक गोष्टींवर पुढील काही तास आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT