Taj Mahal esakal
देश

ताजमहालात शौचालयाजवळ हिंदू देवतांची छायाचित्रं; मत्स्येंद्र गोस्वामींची ASI ला धमकी

सकाळ डिजिटल टीम

देशात ज्ञानवापी मशीद वाद सुरु असतानाच आता ताजमहालबाबत नवा वाद सुरू झालाय.

देशात ज्ञानवापी मशीद वाद (Gyanvapi Masjid) सुरु असतानाच आता ताजमहालबाबत (Taj Mahal) नवा वाद सुरू झालाय. दरम्यान, ताजमहाल स्मारकाच्या आवारातील मंदिरांच्या चित्रांवर आक्षेप घेण्यात आलाय. जालौन-उरईचे संत मत्स्येंद्र गोस्वामी (Matsyendra Goswami) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मोठा आरोप केलाय. ताजमहालच्या आतील फोटो गॅलरीत मुघलियाच्या इमारतींची छायाचित्रं स्वच्छ ठिकाणी लावण्यात आली आहेत, तर शौचालयाजवळ हिंदू देव-देवतांची (Hindu God) छायाचित्रं लावली गेली आहेत. ही छायाचित्रं तेथून तातडीनं हटवा, अन्यथा उपोषण करू, अशी धमकी मत्स्येंद्र गोस्वामी यांनी एएसआयला दिलीय.

संत रविवारी (22 मे 2022) ताजमहालला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी ताजमहालच्या आतील दृष्यांबाबत संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, मी ताजमहालला भेट द्यायला आलो होतो, इथं शौचालयाच्या बाहेर आपल्या भगवान कृष्णाची (Lord Krishna) मूर्ती बसवण्यात आलीय, ती मूर्ती पाहून खूप दुखावलो गेलोय. त्यामुळं तेथून मूर्ती न हटवल्यास उद्या सकाळी ताजमहालासमोर आमरण उपोषण करण्याची धमकी मत्स्येंद्र गोस्वामी यांनी दिलीय.

कॅम्पसमध्ये असणाऱ्या कॉरिडॉरमधील सर्व हिंदू देव-देवतांच्या मूर्ती तातडीनं हटवण्यात याव्यात. तसेच या मूर्ती हटवण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिलाय. ताजमहाल कलाकृतीत दगडी कोरीव कामांमध्ये स्वस्तिकासारखी चिन्हं आहेत, असा दावाही त्यांनी केलाय. याआधी तेजो महालयाच्या अयोध्येतील संत परमहंस दास यांच्या मंदिरावर दावा केल्यानंतर नवा वाद सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT