Mangalsutra Sakal
देश

'मंगळसूत्र काढणं ही मानसिक क्रूरता'; खरंच कोर्ट असं म्हणालं?

मद्रास न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल सोशल मीडियावरुन संताप व्यक्त होत होता.

सकाळ डिजिटल टीम

घटस्फोट प्रकरणात मद्रास हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णय़ावरुन सोशल मीडिया टीकेचा मोठा आगडोंब उसळला होता. पत्नीने मंगळसूत्र काढून टाकणं ही सर्वोच्च मानसिक क्रूरता आहे, असं निरीक्षण मद्रास हायकोर्टाने नोंदवल्याचं व्हायरल होतं होतं. मात्र, आता न्यायालयाने या सर्व टीकेला प्रत्युत्तर देत या प्रकरणाविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. (Madras High Court Report)

मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. असा कोणताही अहवाल देण्यात आलेला नाही. ही माहिती चुकीची आणि अतिशयोक्ती करुन लिहिलेली आहे. उच्च न्यायालयाने याच्या अगदी उलट माहिती दिलेली आहे. मानसिक क्रूरता ही मंगळसूत्र काढल्याने सिद्ध होत नाही.

एका घटस्फोट प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला होता. एका व्यक्तीच्या घटास्फोटाची याचिकेवर निकाल दिला आहे. या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले, तसंच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही केला. तसंच पत्नीने आपल्या पतीविरोधात खोटी पोलीस केसही केली होती. या सगळ्याला न्यायालयाने मानसिक क्रूरता म्हटलं आहे. मात्र मंगळसूत्र काढण्याला मानसिक क्रूरता म्हटलं, अशा अर्थाने हा निकाल चुकीच्या पद्धतीने सगळीकडे व्हायरल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT