Crime News
Crime News esakal
देश

MBBS Student : 'माफ करा.. मी डॉक्टर होऊ शकले नाही'; 9 व्या मजल्यावरून उडी मारुन मेडिकल विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

फॉरेन्सिक टीमनं तपास पूर्ण केला असून पुरावे गोळा केले जात आहेत.

लखनौच्या सरोजिनी नगर (Lucknow Sarojini Nagar) येथील टीएस मिश्रा मेडिकल कॉलेजमध्ये (TS Mishra Medical College) एमबीबीएस (MBBS) प्रथम वर्षात शिकणाऱ्या मृणाल सिंग (Mrinal Singh) या 23 वर्षीय विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीये.

ही घटना काल उशिरा घडलीये. मृत मृणाल सिंग ही पीरबाहोर पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक राजपथ इथं असलेल्या एका खासगी कोचिंग संस्थेचे शिक्षक कौशल किशोर सिंग यांची मुलगी आहे. कॉलेज कॅम्पसमध्येच बांधलेल्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती.

महाविद्यालयातील इतर विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल 902 क्रमांकाच्या खोलीत राहायची. साक्षी नावाची विद्यार्थिनीही तिच्यासोबत राहत होती. लखनौ पोलिसांनी सांगितलं की, मृणालच्या खोलीतून एक सुसाईड नोटही सापडलीय. यामध्ये तिनं लिहिलंय, सॉरी... मी डॉक्टर होऊ शकले नाही. शिवाय, तिनं एमबीबीएस पूर्ण करू न शकल्यामुळं दु:खही व्यक्त केलंय. दरम्यान, फॉरेन्सिक टीमनं तपास पूर्ण केला असून पुरावे गोळा केले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

GT vs KKR Live Score IPL 2024 : धुळीचं वादळ अन् जोरदार पाऊस गुजरातच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरवणार?

SCROLL FOR NEXT