Medical Education sakal
देश

आता 'एमबीबीएस'चं शिक्षण हिंदीतून; ट्रान्सलेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सकाळ डिजिटल टीम

इंदूर : देशातील सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर मध्य प्रदेशातील एमबीबीएस अभ्यासक्रमाचं शिक्षण घेण्यासाठीची पर्यायी माध्यम बनणार आहे. मागील अनेक वर्षांपासून यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी हिंदी भाषा वापरण्यास सुरुवात होऊ शकते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. (Medical Study in Hindi )

अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन शैक्षणिक सत्रात देशातील प्रमुख हिंदी भाषिक प्रांतातील खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या एकूण 4,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच हिंदी पुस्तकांमध्ये अभ्यास करण्याचा पर्याय मिळू शकेल. त्याचवेळी संबंधित समितीचे सदस्य आणि फिजियोलॉजीचे माजी सहयोगी प्राध्यापक डॉ. मनोहर भंडारी यांनी सांगितले की, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी हे हिंदी माध्यमातील आहेत. मात्र इंग्रजी माध्यमातून पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षात अडचणींचा सामना करावा लागतो.

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य सरकार तीन प्रस्थापित इंग्रजी लेखकांच्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या पुस्तकांचे हिंदीत रूपांतर करण्याचे काम पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा चेहरामोहरा बदलू शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

अधिका-याने सांगितले की, खाजगी प्रकाशकांची ही पुस्तके शरीर रचनाशास्त्र (एनाटॉमी), शरीर क्रिया शास्त्र (फिजियोलॉजी) आणि जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) या विषयांशी संबंधित आहेत. ही पुस्तके छापण्यापूर्वी 55 तज्ञ शिक्षकांच्या मदतीने विविध पातळ्यांवर तपासली जाणार आहेत.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या वर्गात हिंदीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आवाहन शिक्षकांना करण्यात आले असले तरी राज्यातील वैद्यकीय शिक्षण पूर्वीप्रमाणे इंग्रजी माध्यमातूनही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाने उमेदवारांना लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि व्हायवा 'हिंग्लिश' (हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण) मध्ये देण्याचा पर्याय आधीच उपलब्ध करून दिला असून त्याचे परिणाम सकारात्मक आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT