Mehbooba Mufti on Kashmiri Pandit Murder e sakal
देश

विदेशी पर्यटक मुघल वास्तूकला बघण्यासाठी भारतात येतात : मेहबूबा मुफ्ती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विदेशातील ५० टक्के पर्यटक फक्त मुघल वास्तूकला पाहण्यासाठी भारतात येतात, तर उर्वरीत ५० टक्के पर्यटक काश्मीर पाहण्यासाठी येतात, असा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला आहे. तसेच पर्यटक ज्या गोष्टी पाहण्यासाठी भारतात येतात त्या दोन्ही गोष्टी भाजपने उद्ध्वस्त केल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दिल्लीतील कुतुबमिनारच्या बाहेर निदर्शने करत कुतुबमिनारचं नाव विष्णूस्तंभ ठेवण्याची मागणी केली होती. तसेच दिल्ली भाजपने राष्ट्रीय राजधानीतील अकबर रोड, हुमायून रोड, औरंगजेब लेन आणि तुघलक लेन यांसारख्या इतर महत्त्वाच्या खुणा मुघल शासकांच्या नावावर असल्याने त्यांची नावे बदलण्याची मागणी केली होती. यावरूनच मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राहुल भट या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली. गुरुवारी, 14 मे रोजी चदूरा येथील तहसीलदार कार्यालयात दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. दुसऱ्याच दिवशी याच जिल्ह्यातील गुडूरा येथे कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून काश्मिरी पंडीत रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही या ठिकाणी सुरक्षित नाही म्हणत निदर्शने करत आहेत.

मेहबूबा मुफ्ती यांनी देखील राहुल भटच्या हत्येनंतर काश्मीरमधील तापलेल्या वातावरणावर भाष्य केले. भारत सरकारने काश्मीरबाबतचा आपला दृष्टिकोन बदलावा. सरकारने काश्मिरींवर दबाव आणला आहे आणि त्यांना हिंदू विरुद्ध मुस्लीम दंगली भडकवून इतर मुद्द्यांपासून दूर जात आहे, असा आरोप देखील मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT