Mehul Choksi esakal
देश

Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीने न्यायालयीन लढाई जिंकली; भारतात आणणे झाले अवघड

उच्च न्यायालयाने 14 एप्रिल रोजी मेहुलला मोठा दिलासा दिला आहे.

राहुल शेळके

Mehul Choksi: फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने कायदेशीर लढाई जिंकली आहे. भारतातील 13,000 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अँटिग्वा आणि बारबुडा उच्च न्यायालयाने 14 एप्रिल रोजी मेहुलला मोठा दिलासा दिला आहे.

उच्च न्यायालयाने मेहुलच्या बाजूने निर्णय देताना त्याला देशाबाहेर नेले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

मेहुल चोक्सीचा दावा:

मेहुल चोक्सीने न्यायालयात दावा केला आहे की त्याच्यावर खटले दाखल करण्यात आले होते आणि अॅटर्नी जनरल आणि पोलिस प्रमुख (अँटिग्वा) यांनीही त्याच्या वतीने संपूर्ण तपास केला होता.

डोमिनिकाच्या नेचर आयल वृत्तानुसार, न्यायालयाने म्हटले की चोक्सी त्याच्या जागी योग्य आहे आणि त्याला अमानवी किंवा अपमानास्पद वागणूक दिली जाऊ शकते.

मेहुल चोक्सीने 23 मे 2021 रोजी अँटिग्वा आणि बारबुडा येथून जबरदस्तीने केलेल्या अपहरणाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशाशिवाय मेहुल चोक्सीला देशाबाहेर नेले जाऊ शकत नाही.

चोक्सीला त्याच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने डोमिनिका येथे नेण्यात आले होते का, याची पडताळणी करण्याचे आदेशही न्यायालयाने डॉमिनिकन पोलिसांना दिले आहेत.

PNB फसवणूक :

विशेष म्हणजे मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून देश सोडून पळून गेला होता. सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की फौजदारी न्याय प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी फरारी आणि गुन्हेगारांना भारतात परत आणण्याचा त्यांचा निर्धार आहे.

सीबीआयने 15 फेब्रुवारी 2018 रोजी मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर, 2022 मध्ये, सीबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याबद्दल मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध आणखी पाच फौजदारी गुन्हे नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT